Fri. Oct 7th, 2022

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह

देशभरात गोपाळकालाचा उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दहीहंडीचं वेगळं आकर्षण आहे. राज्यात दहीहंडीचा विशेष उत्साह दिसत आहे. मुंबई, ठाण्यासह पुण्यात दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवात लाखोंच्या बक्षीस देण्यात येतात. गोविंदा पथकं अनेक महिने मानवी मनोरे लावण्यासाठी सराव करत असतात. कोरोना संकटामुळं यंदा तब्बल दोन वर्षांनी दहीहंडी साजरी होणार आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातील गोविंदा पथकं मनोरे रचायला सज्ज झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सुरक्षेची सर्वोतोपरी काळजी घेतली आहे.

पथकांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. बाळकृष्णाने ही परंपरा सुरु केली. भगवान श्रीकृष्णांना बाल्यावस्थेत लोणी अत्यंत प्रिय होतं. आणि लोणी खाण्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असे. ते पाहून इतर घरातल्या गवळणी आपापल्या घरातलं लोणी घराच्या छतावर बांधून ठेवत असत. मात्र आपल्या सवंगड्यांच्या मदतीनं ते लोणी कृष्ण काढत असे आणि सर्व सवंगडी त्या लोण्याच्या गोळ्याचा आस्वाद घेत असत. अनादी कालापासून हीच परंपरा आजही सुरू आहे. आज हेच सवंगडी एकत्र येतात. काही महिन्यांचा मानवी थर लावण्याचा सराव करतात आणि मग दहीहंडीच्या दिवशी ही गोविंदा पथकं मुंबई, ठाणे,पुणे,नाशिक,औरंगाबाद,कोकण अशा आपल्या आसपासच्या अनेक जिल्ह्यात फिरतात. उंच लटकवलेली दहीहंडी फोडतात आणि तो आनंद साजरा करतात.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.