Sat. Sep 21st, 2019

अभिनेत्री स्मिता गोंदकरने फोडली दहीहंडी, बक्षिसाची रक्कम केरळ पूरग्रस्तांना

0Shares

ठाण्यात भाजप पुरस्कृत स्वामी प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेली मराठी कलाकारांसाठीची दहीहंडी उत्साहात पार पडली. ठाण्यातील खेवरा सर्कल इथं बांधण्यात आलेली सेलिब्रिटी दहीहंडी बिगबॉस फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने फोडली. शेलार मामा फाउंडेशनच्या गोविंदांसोबत चौथ्या थरापर्यंत जाऊन तिने दहीहंडी फोडली.

स्मिता गोंदकर हिने थरावर जाण्यासाठी काही वेळ सराव केला आणि मोठ्या हिंमतीने रोपचा आधार घेत शेलार मामा फाउंडेशन च्या पथकासोबत चौथ्या थरापर्यंत जाऊन ही दहीहंडी फोडली आहे. यावेळी स्मिताला प्रोत्साहन देण्यासाठी अभिनेता सुशांत शेलार,अभिनेता माधव देवचक्के,अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत,अभिनेत्री रिचा अग्निहोत्री यांनी देखील हजेरी लावली होती.

स्मिताला हंडी फोडण्यासाठी बक्षीस म्हणून देण्यात आलेले एक लाख रुपये स्मिताने केरळमधील पूरग्रस्तांना मदत म्हणून दिली आहे. 

देशभरात गोकुळाष्टमीचा उत्साह, मुंबईत दहीहंडीसाठी गोविंदा सज्ज….

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *