Sat. Oct 31st, 2020

धुळवडीला नाशिकमध्ये दाजीबा वीराची मिरवणूक साजरी

किरण गोटूर, जय महाराष्ट्र, न्यूज नाशिक

राज्यभरात आज धुळवडीचा उत्सव साजरा केला जातो आहे.सर्वत्र आज धुळवडी निमित्त रंगांची उधळण असली तरी नाशिकमध्ये मात्र धुळवडीच्या दिवशी वीरांना नाचवण्याची अनोखी परंपरा आहे. 300 वर्षांची ही परंपरा आजही कायम असून, धुळवडीनिमित्त नाशिकमध्ये वीरांची मिरवणूक पार पडली. दरम्यान ऐतिहासिक दाजीबा विराची मिरवणूक बघण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

राज्यभरात आज धुळवडी साजरी होत असली, तरी नाशिकमध्ये मात्र आजचा दिवस विरांचा मानला जातो. वेगवेगळ्या देव देवतांचं सोंग घेऊन हे वीर नाशिकच्या गोदावरीत आपल्या घरातल्या देवांना स्नान घालतात आणि परततात. या विरांमध्ये महत्वाच्या असलेल्या दाजीबा विराची मिरवणुक सुरू झालीये. ती शहरात रात्रभर वीरांना मिरवलं जातं आणि उद्या सकाळी हे वीर घरी परततात हे वीर. हलगीच्या तालावर  नाचत असतात त्यात भाविकही मोठ्या आनंदात वीर दाजीबा बरोबर नाचत असतात.

वीर नाचवण्याच्या परंपरेचा 300 वर्षांपासून बेलगावकर घराण्याकडे मान आहे. हा दाजिबा वीर नवसाला पावणारा असल्याचं मानलं जातं. त्यामुळे भाविक श्रद्धेने आपल्या लहान बाळांना वीरांच्या हातात देऊन नाचवतात. त्यामुळे बाळ निरोगी आणि सदृढ होतं, असं मानलं जातं. वीरांच्या दर्शनाला नाशिककर मोठी गर्दी करतात.

राज्यभरात आज रंग खेळले जात असले तरी नासिकमध्ये मात्र रंगपंचमी साजरी केली जाते.आज मान असतो तो गंगेत आपले देव स्नानासाठी आणणाऱ्या वीरांचा. दाजिबा वीराची परंपरा मोठी असल्यानं आणि याचा थाटही काही वेगळाच असल्याने दाजिबा वीराच्या मिरवणुकीत नाशिककर मोठ्या हौसेनं सहभागी देखिल होताना दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *