Jaimaharashtra news

भारत-चीन वादावर दलाई लामांनी दोन्ही देशांना दिला महत्वाचा सल्ला

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतात पूर्ण स्वातंत्र्य असल्यामुळे मी अनेक गोष्टी करु शकतो, जिथे स्वातंत्र्य नाही, ती जागा मला आवडत नाही, अशा शब्दात भारताचं कौतुक करताना लामांनी चीनवर

अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

 

भारत आणि चीनला एकमेकांच्या शेजारी राहायचं असल्यामुळे हिंदी-चिनी भाई भाई या मंत्राशिवाय पर्याय नाही’ अशा शब्दात तिबेटियन धर्मगुरु दलाई लामा यांनी दोन्ही

देशांना सबुरीनं वागण्याचा सल्लाही दिला आहे.

 

सध्या डोकलाम मुद्द्यावरुन भारत आणि चीनमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे.  भारत-चीनदरम्यान डोकलाम भागावरून उद्भवलेला तणाव हा फारसा गंभीर

नसल्याचेही दलाई लामा यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगीतले.

Exit mobile version