Wed. Dec 11th, 2019

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 36 वर्षीय स्टेनने कसोटीला रामराम केला असला तरी एक दिवसीय आणि टी-20 क्रिकेट खेळत राहणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 36 वर्षीय स्टेनने कसोटीला रामराम केला असला तरी एक दिवसीय आणि टी-20 क्रिकेट खेळत राहणार आहे. क्रिकेट कारकीर्द लांबवण्यासाठी आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे स्टेनने म्हटले आहे.
वेगाचा बादशहा अशी ओळख असणाऱ्या स्टेनने डिसेंबर, 2004 रोजी इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 15 वर्षाच्या कारकीर्दीमध्ये स्टेनने आफ्रिकेकडून 93 कसोटी लढती खेळल्या. यात त्याने 22.95 च्या सरासरीने 439 बळी घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या पहिल्या पाच वेगवान गोलंदाजांमध्ये स्टेनचे नाव आहे.

कोण आहे डेल स्टेन

डिसेंबर, 2004 रोजी स्टेनने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमधून क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. क्रिकेटच्या जगतात वेगाचा बादशहा अशी डेल स्टेनची ओळख आहे.  15 वर्षाच्या कारकीर्दीमध्ये स्टेनने आफ्रिकेकडून 93 कसोटी लढती खेळल्या आहेत. 22.95 च्या सरासरीने 439 बळी त्याने घेतली आहे.

स्टेनचे वादळ सर्वात कमी स्ट्राईक-रेटने कसोटीत 200 बळींचा टप्पा गाठला होता. आफ्रिकेकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज

आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारी 263 आठवडे नंबर वन राहिलेला गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या पहिल्या पाच वेगवान गोलंदाजांमध्ये स्टेनचे नाव आहे.

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 36 वर्षीय स्टेनने कसोटीला रामराम केला असला तरी एक दिवसीय आणि टी-20 क्रिकेट खेळत राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *