विमानतळावर ५जी इंटरनेट सेवा धोकादायक?

अमेरिकेच्या विमानतळांवर बुधवारपासून ५जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, ५जी वेव्हचा विमान यंत्रणेवर परिणाम होण्याची शक्यता अमेरिकेने वर्तवली आहे. त्यामुळे ५जी इंटरनेट सेवा धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.
५जी इंटरनेट सेवा धोकादायक असल्याची शक्यता अमेरिकेने वर्तवल्यामुळे जगातील अनेक विमान कंपन्यांनी अमेरिकेकडे जाणारी विमाने रद्द केली आहेत. एअर इंडिया, ऑल निप्पॉन एअरवेज, जपान एअरलाईने अमेरिकेला जाणाऱ्या विमानसेवा रद्द केल्या आहेत.
एअर इंडियाने ट्विट करत अमेरिकेत जाणारी भारतीय विमानांची उड्डीणे रद्द केल्याची माहिती दिली आहे. एअर इंडियाने ट्विट केले की, अमेरिकेत ५जी इंटरनेट सेवा चालू केल्यामुळे भारत-अमेरिका उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडियाची आठ उड्डाणे आहेत. दिल्ली-न्यूयॉर्क, न्यूयॉर्क-दिल्ली, दिल्ली-शिकागो, शिकागो-दिल्ली, दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को, सॅन फ्रान्सिस्को-दिल्ली, दिल्ली-नेवार्क आणि नेवार्क-दिल्ली अशी विमाने आहेत. गुरूवारी ऑपरेट होणारी सहा इंडो-यूएस उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
I have been reading the posts, and I definitely concur with what Tom said.