Tue. Aug 9th, 2022

बंधाऱ्यावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

यवतमाळ जिल्ह्यात सध्या पूराने थैमान घातले आहे. विशेषत: ग्रामीण भागातील रस्तेच बंद झाले आहे. मात्र, या परिस्थितीत नागरिकांना जीव धोक्यात घालून वाट काढावी लागत आहे. मृत्यूशी झूंझतांनाचे ही जिवंत चित्र दारव्हा तालुक्यातील राजूरा गावाजवळून वाहणाऱ्या कुपटा नदीवरील आहे. या नदीवर पुल आहे. अशावेळी नागरिकांना नदीवरच बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यावरून जावे लागते. बंधाऱ्याच्या गेटसाठी सोडलेला तब्बल ४ ते ५ फुटांचा अंतर ओलांडण्यासाठी जीव धोक्यात घालून उडी मारावी लागते. मात्र, राजूरा गावाजवळील या पुलावरून पूर असल्यास शेवटी नाईलाजाने बंधाऱ्यावर चढावे लागते. शाळकरी मुले व महिलांसाठी काही नागरिक राजूरा गावातून लाकडी पाटी आणून या बंधाऱ्याच्या अंतरामध्ये ठेवतात. पावसाळ्यात हातणीच्या शाळकरी मुलांसह नागरिकांसाठी हा जीवघेणा प्रवास नित्याचाच ठरला आहे. प्रशासनाने नागरिकांची ही समस्या निकाली काढावी अशी मागणी आहे. पावसामुळे अनेक भागात नागरिकांना जीव घेणा प्रवास करावा लागत आहे. काही नद्यांना पुराचे स्वरूप आले आहे.नदीवरील पुलावरून जाताना जीव घेणा प्रवास करावा लागत आहे. तर शाळकरी मुलांचा बंधाऱ्यावरून जीवघेणा प्रवास सुरु आहे.

राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे, अनेक शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, तर काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाल्याचे चित्र पहिला मिळाले आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे, पूर परिस्थितीमुळे काही ठिकाणी घरे पाण्याखाली गेली आहेत तर काही ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर देखील करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.