Mon. Jul 22nd, 2019

दानवे- खोतकरही फेविकॉलचा मजबूत जोड – मुख्यमंत्री

228Shares

 

औरंगाबादमध्ये झालेल्या येती मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेबरोबर असलेल्या युतीबद्दल वक्तव्य केले. मनाने आम्ही वेगळे नव्हतो, परिस्थितीमुळे वेगळे झालो होतो. मात्र आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलेले पक्ष असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना मतदारसंघातून माघार घेतल्यामुळे जशी भाजप-सेनेची युती फेविकॉलचा जोड आहे तशीच दानवे- खोतकर हे फेविकॉलचा मजबूत जोड असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

औरंगाबादमध्ये शिवसेना- भाजपाच्या युती मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी युतीबद्दल वक्तव्य केले.

मनाने वेगळे नव्हतो, परिस्थितीमुळे वेगळे झालो होतो असे मुख्यमंत्री म्हणाले.

आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलेले पक्ष असल्याचेही ते म्हणाले.

मराठवाड्याला दुष्काळमुक्त कसं करता येईल हे पाहिलं पाहिजे.

तसेच शेवटच्या शेतकऱ्याला योजनेचा लाभ झाला पाहिजे असे म्हटलं आहे.

2021पर्यंत प्रत्येक गरीबाकडे हक्काचं घर असेल असेही मुख्यमंत्री मेळाव्यात म्हणाले आहे.

मराठवाड्यात आठही जागा युतीच्याच असतील असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.

 

228Shares

Leave a Reply

%d bloggers like this: