Jaimaharashtra news

मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचा दापोली मुरुड समुद्रकिनारी असलेला बंगला तोडण्यात आला आहे. मुरुड समुद्रकिनारी सीआरझेड नियमांचं उल्लंघन करुन हा बंगला बांधल्यानं ही कारवाई केली गेली.परवानगी न घेताच हा बंगला बांधण्यात येत असल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती.

मिलिंद नार्वेकर यांचा मुरुड दापोलीच्या समुद्रकिनारी अलिशान बंगला बांधण्यास सुरुवात केली होती. मात्र सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करून हा बंगला बांधण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आल्यामुळे हा बंगला पाडण्याचे काम आज सकाळपासूनच सुरू करण्यत आले. किरीट सोमय्या यांनी या कारवाईचा व्हिडीओ ट्विट करून माहिती दिली आहे.

‘करून दाखविले !!!! मिलींद नार्वेकरचा बंगलो तोडला. मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा बेकायदा बंगलो पाडण्याचे काम आत्ता सुरू झाले. पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा उद्या मी दापोलीला जावून तोडकामाची पाहणी करणार’, असं ट्विट किरीट सोमैय्या यांनी केलं आहे.

Exit mobile version