Tue. Oct 26th, 2021

तुळजाभवानी मंदिरातील दर्शन पास बंद होणार

उस्मानाबाद : तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठीची पास पद्धत 31 डिसेंबर नंतर बंद करण्यात येणार आहे. भाविकांना सहजपणे सुलभ दर्शन व्हावे म्हणुन मुख दर्शन, धर्म दर्शन व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पास बंद करावी म्हणून पाळीकर पुजारी मंडळ, भोपे पुजारी मंडळ, उपाध्ये पुजारी मंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. यानंतर पास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्य-परराज्यातुन भाविक येतात. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी तसेच भाविकांची गणनेसाठी बंगळुरुतील त्रिलोक कंपनीकडे पास वाटपाचे काम देण्यात आले होते. मात्र या पासमुळेच भाविकांना मनस्ताप होत आहे.

मंदिर प्रशासनाकडून मुख दर्शन, धर्म दर्शन, अभिषेक दर्शन आणि पेड दर्शन इत्यादी पास मंदिर भाविकांसाठी उपलब्ध करुन दिले होते. परंतु पास असूनदेखील दर्शनासाठी तासनतास भाविकांना रांगेत उभे रहावे लागत होते. यामुळे भाविक वर्गात प्रचंड नाराजी होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *