Tue. Dec 7th, 2021

राफेल कराराबाबत खुलासा

राफेल विमान खऱेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी रान पेटवलं असताना आता मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

राफेल विमानांची किंमत वाढवली नसल्याचं स्पष्टीकरण दसॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपिअर यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे अनिल अंबानी व्यतिरिक्त 30 जणांसोबत करार केला असून अंबानींची निवड मोदी सरकारच्या दबावामुऴे केली नसल्याचं खुलासाही त्यांनी केला. तसंच राहुल गांधींनी केलेले आरोप खोटे असल्याचं एरिक ट्रॅपिअर यांनी म्हटले आहे.

एका वृत्तसंस्थेल्या दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये त्यांनी राफेल करारावर आपली बाजू स्पष्ट केली. ‘आम्ही काँग्रेसचे सरकार असतानाही काम केले असून १९५३ मध्ये जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असताना आमच्या कंपनीने भारताशी पहिल्यांदा करार केला होता. आम्ही भारत सरकारसोबत काम करतो. आम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करत नाही,’ अशा शब्दात एरिक ट्रॅपियर यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे.

“देशाचा चौकीदारच निघाला चोर” – राहुल गांधींचा हल्लाबोल

यूपीएचीच रिलायन्सशी बोलणी- प्रसाद

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *