९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर…

९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी नाशिकमध्ये होणार आहे. नाशिकमधील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. कोरोनामुळे मराठी साहित्य संमेलन रद्द करण्यात आले होते. मात्र आता ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारख्या जाहीर झाल्या आहेत.
मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तयारी संदर्भात आढावा बैठक घेतली आहे. वेगवेगळ्या विभागातील सर्व अधिकाऱ्यांना यावेळी बोलवून त्यांना कामाची जाणीव भुजबळांनी करून दिली. ‘या संमेलनात कोणतेही राजकारण आणणार नाही. थोडं मागे पुढं होते मात्र कुठेही दुजाभाव राहणार नाही यासाठी पराकाष्ठा करू’, असा विश्वास छगन भुजबळ यांनी दिला आहे.
मराठी साहित्य संमेलन भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रशस्त मैदानावर पार पडणार आहे. तसेच या संमेलनात बालकवी संमेलन, कवी कट्टा, गझल आणि भव्य पुस्तकाचे प्रदर्शन यावेळी होणार आहे.