Fri. Jul 30th, 2021

…यामुळे मुलीचं स्मशानात लावलं लग्न

देशाने विज्ञानांमध्ये कितीही प्रगती केली तरी अंधश्रद्धा ही नष्ट होणार नाही. लोक अजुनही जुन्या चालीरीती तसेच कर्मठ विचांराचे आहे. या अंधश्रद्धेला खोटं ठरवण्यासाठी परभमी जिल्ह्यातील एका कुटुंबाने एक अनोखा प्रयोग केला आहे.

खरंतर स्मशानभूमीकडे जाण्याचा किंवा बघण्याचा विचार सुद्धा सहसा कोणी मनात आणत नाही. मात्र परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात राहणाऱ्या जाधव कुटुंबीयांनी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपल्या मुलीचं लग्न चक्क स्मशानभूमीत लावून दिल्याचे समोर आले आहे.

जाधव कुटुंबीयांनी स्मशानभूमीत लाऊन दिलेल्या लग्नामुळे जिंतूर शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ तर उडाली आहे. सोबतच स्मशानात लग्न करणाऱ्या या नवीन जोडप्याची जिल्ह्यात चर्चा ही रंगू लागली आहे.

जिंतूर शहराच्या सार्वजनीक स्मशानभूमीत जिंतूरात राहणाऱ्या सौमिता जाधव आणि बुलढाणा जिल्ह्यातील गोविंद गायकवाड या दोघाचा लग्न सोहळा संपन्न झाला.

अंनिसने अनेकवेळा स्मशानात वेगवेगळे आंदोलन केले आहे. मात्र स्मशानात लग्न लाऊन देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

स्मशानभूमीबद्दल अंधश्रद्धा दूर करण्यासाठी हा लग्नसोहळा फार मदत करेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *