भारतात घातपात घडवण्यासाठी दाऊद इब्राहिमची तयारी

१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम भारतात घातपात करण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्याने विशेष पथक तयार केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाऊद इब्राहिम विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
दाऊद इब्राहिमने भारतात घातपात करण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. हे पथक भारतातील महत्त्वाचे राजकीय नेते, प्रमुख उद्योजक यांना लक्ष्य करणार असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या तक्रारीत उघड झाले आहे. तसेच स्फोटक आणि घातक शस्त्रास्त्रांच्या मदतीने देशामध्ये विविध भागांमध्ये हिंसाचार घडवण्याची योजना दाऊद इब्राहिमने आखली आहे.
सक्तवसुली संचालनालयाने दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला मनी लाँड्रीगप्रकरणी चौकशीसाठी शुक्रवारी अटक केली आहे. तर आता दाऊद इब्राहिम भारतात घातपात करणार असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.