Tue. Oct 19th, 2021

दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर?

वृत्तसंस्था, कराची

 

मुंबई 93 ब्लास्टचा मास्टरमाईंड आणि भारताविरोधी अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला दाऊद इब्राहिमची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती समोर आली आहे.

 

दाऊद इब्राहिमला सध्या कराचीतल्या एका रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती असून, या वृत्तास अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

 

दाऊदच्या प्रकृतीबाबत मुंबईतील त्याच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली असली, तरी याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही.

 

सूत्रांच्या माहितीनूसार दाऊदला 20 दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यात त्याच्या शरीराचा उजवा भाग बधीर झाला.

 

त्यातच 22 एप्रिल रोजी दाऊदवर कराचीत ब्रेन सर्जरी पार पडली. यावेळी ती शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने दाऊद व्हेंटिलेटरवर पोहोचल्याचं वृत्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *