Sunday, April 20, 2025 10:16:09 PM
20
कल्याण तालुक्यात रूंदे-टिटवाळा मार्गावर टँकर उलटून चालक जखमी. धोकादायक वळण व अपूर्ण रस्त्यामुळे अपघात; रस्त्याचे काम थांबल्याने वाहतूक व नागरिक हैराण.
Sunday, April 20 2025 06:05:12 PM
धाराशिवच्या साक्षी कांबळेने बीडमध्ये छेडछाड व ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केली. विवाहाच्या आधीच आयुष्य संपवलं; न्यायासाठी आईने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले.
Sunday, April 20 2025 05:12:20 PM
CSMIA विमानतळ 8 मे रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत मान्सूनपूर्व देखभालीसाठी बंद राहणार. दोन्ही धावपट्ट्यांची तपासणी; प्रवाशांच्या सेवांवर परिणाम होणार नाही.
Sunday, April 20 2025 04:47:08 PM
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूर, भूस्खलन व ढगफुटीने हाहाकार; रामबनमध्ये तीन मृत, एक बेपत्ता. 100 हून अधिक घरे उद्ध्वस्त, मदत कार्य सुरू.
Sunday, April 20 2025 03:08:50 PM
जळगावमधील पिंप्राळा रोडवरील स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय उघडकीस आणला. चार महिलांची सुटका, व्यवस्थापक अटकेत; मुख्य मालक फरार.
Sunday, April 20 2025 02:09:03 PM
क्रिकेट सट्ट्यात 60 हजार गमावल्यामुळे मानसिक तणावात आलेल्या नवीन पनवेलमधील तरुणाने वाशी खाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.
Sunday, April 20 2025 12:37:29 PM
श्रीरामपूरहून भिवंडीला निघालेला 24 टन साखरेचा ट्रक चालकाने गुजरातकडे वळवला. पोलिसांनी तपास करून व्यारामधून ट्रक व चालकास अटक केली. 28.5 लाखांचा मुद्देमाल जप्त.
Sunday, April 20 2025 11:37:44 AM
ढाकेफळ (पैठण) येथे नव्या घरावर पाणी मारताना विजेचा धक्का बसून 16 वर्षीय साबेर शेख याचा मृत्यू झाला. नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या युवकाच्या मृत्यूनं गावात शोककळा पसरली.
Sunday, April 20 2025 11:30:49 AM
ग्रीन सोल्यूशन्सने 55 कर्मचाऱ्यांना मालवण सहलीसाठी विमान प्रवासासह नेले. या उपक्रमातून टीम एकात्मता, प्रेरणा आणि कर्मचारी कल्याणाचा आदर्श समाजासमोर मांडला गेला.
Saturday, April 19 2025 06:06:27 PM
राज-उद्धव संभाव्य युतीवर नवनीत राणांनी टोला लगावत हिंदुत्वाची लढाई सुरूच राहील असं म्हटलं. तसेच मराठी भाषेबाबत ठाम भूमिका मांडून ठाकरे गटावर अप्रत्यक्ष टीका केली.
Saturday, April 19 2025 04:24:50 PM
अमळनेरमध्ये जेसीबीच्या निष्काळजी खोदकामामुळे मुख्य पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया गेलं, अर्ध्या शहरात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे.
Saturday, April 19 2025 02:59:42 PM
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याची तयारी दर्शवत, महाराष्ट्राच्या हितासाठी भांडणं विसरायला हवं असं मत व्यक्त केल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
Saturday, April 19 2025 02:12:22 PM
यवतमाळमध्ये पाणी आणताना १२ वर्षांच्या वेदिकाचा मृत्यू झाला. जलजीवन मिशन असूनही पाण्यासाठी जीव गमवावा लागतो, हे प्रशासनाच्या अपयशाचं उदाहरण असल्याची टीका.
Saturday, April 19 2025 01:35:13 PM
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही संजय घाटगे यांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधी आपली भूमिका कायम ठेवली असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत राहणार असल्याचे स्पष्ट केले.
Saturday, April 19 2025 12:53:08 PM
बीडमध्ये मुख्यमंत्री दौऱ्यासाठी हेलिपॅड उभारताना १६ झाडांची कत्तल; पर्यावरणप्रेमी संतप्त, वन विभागाची परवानगी होती का, यावर प्रश्न उपस्थित.
Saturday, April 19 2025 12:12:39 PM
विलेपार्ले पूर्वमधील एक जुने आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाणारे जैन मंदिर बृहन्मुंबई महानगरपालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाई अंतर्गत पाडले.
Saturday, April 19 2025 11:54:12 AM
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला बाबा भिडे पूल पुढील दीड महिना वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे हा पूल बंद करण्यात आल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Friday, April 18 2025 09:26:52 PM
नाशिक शहरात गेल्या काही आठवड्यांपासून सीएनजी (कंप्रेस्ड नॅचरल गॅस)चा तीव्र तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे
Friday, April 18 2025 08:51:45 PM
कोपरगावातील गजानन नगर परिसरात एका पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने प्रचंड धुमाकूळ घातला. अवघ्या एका दिवसात तब्बल १७ नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Friday, April 18 2025 08:46:53 PM
राज्याच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा कर्जमाफीचा मुद्दा गाजू लागलाय. अशा पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे आणि थेट इशाराही दिला आहे.
Friday, April 18 2025 06:49:45 PM
दिन
घन्टा
मिनेट