Thu. Oct 21st, 2021

पंढरपुरात बेवारस मृतदेहाची विटंबना, अंत्यसंस्काराऐवजी मृतदेह पोत्यात बांधला

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

पंढरपूर म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं दैवत. याच पंढरीत मरण येऊन आपल्याला मोक्ष मिळावा अशी अनेकांची इच्छा असते. अनेक निराधार, वृद्ध व्यक्ती त्या मनोकामनेनं पंढरीत येतात. पण यात कोणाचा आकस्किम मृत्यू झाल्यास काय होतं याचं भयानक वास्तव समोर आलं.

 

पंढरपूरच्या कॉटेज रुग्णालयात एका बेवारस व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी तो पोत्यात बांधून ठेवण्यात आला. शवविच्छेदनानंतर हा मृतदेह पोत्यात बांधून पत्र्याच्या पेटीत ठेवण्यात आला. हा धक्कादायक प्रकार सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघमारे यांच्या निदर्शनास आला. कॉटेज रुग्णालय तसंच पोलिसांकडे याची विचारणा केली असता त्यांनीही उडवाउडवीची उत्तरं दिली. मृत्यूनंतरही या मृतदेहांच्या पदरी विटंबनाच येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *