Sun. Sep 19th, 2021

पीपीई किटमध्ये सापडला कुजलेला मृतदेह

पालघर: पालघर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळ पीपीई किटमध्ये कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला आहे.

मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला अडचणीत हा मृतदेह दिसून आला. पीपीई किटमध्ये मृतदेह असल्याचं स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी मनोर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *