Sun. Oct 24th, 2021

अंबरनाथ पूर्व विभागात झाड पडून एका रिक्षाचालकाला मृत्यू

पावसामुळे अंबरनाथ पूर्व विभागात मुख्य रिक्षा स्टँडच्या जवळ असलेले एक झाड स्टँडच्या कार्यालयावर पडले आहे. या कार्यालयाच्या बाहेर  रिक्षाचालक बसले होते. त्यातील एका रिक्षाचालकाला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

पावसामुळे अंबरनाथ पूर्व विभागात मुख्य रिक्षा स्टँडच्या जवळ असलेले एक झाड स्टँडच्या कार्यालयावर पडले आहे. या कार्यालयाच्या बाहेर  रिक्षाचालक बसले होते. त्यातील एका रिक्षाचालकाला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.नाव विष्णू सोळंकी असं या रिक्षा चालकाचे नाव आहे.

पावसाची जोर वाढल्याने झाड पडले.

अंबरनाथ पूर्व भागात रेल्वे स्थानकाच्या जवळील मुख्य रीक्षा स्टँडच्या कार्यालयावर वृक्ष पडल्याने हा अपघात घडला आहे.

यामध्ये त्याठिकाणी बसलेल्या दोन रिक्षाचालकांपैकी एक जण गंभीर जखमी झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे.

या ठिकाणी वीज वितरण विभागाची विद्युत वायर होती. आणि हे झाड चालू लाईनीवर हे वृक्ष पडल्याने त्या चालकाला विजेचा धक्का लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विजेची वाहिनी सुरू असताना हा अपघात झाल्याने राहिल्याने या रिक्षाचालकाला वाचविण्यात यश आलं नाही.  घटनेच्या वेळी शेजारी असलेल्या पोलीस चौकीत  एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता असंही म्हटलं आहे.

विजेची वाहिनी बंद करे पर्यंत संबंधित रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच रिक्षाचालकांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने हा अपघात घडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *