नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी आलेल्या वृद्धाचा गोळी लागून मृत्यू

समाजातील व्यक्तीच्या अंत्ययात्रेसाठी आलेल्या वृद्धाचा गोळी लागून नाहक बळी गेल्याची दुर्दैवी तितकीच धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात पिंप्री येथे घडली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. येथील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांचे वडील श्रावण बारकू मोहकर यांचे 85व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. समाज बांधवांसोबत त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आली. यावेळी मयत श्रावण मोहकर यांना मानवंदना देण्याचे ठरले. यात या वृद्धाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं ?
सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांचे वडील श्रावण बारकू मोहकर यांचे 85व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
अंत्ययात्रा स्मशानभूमीत आल्यानंतर मयत श्रावण मोहकर यांना मानवंदना देण्याचे ठरले.
सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांनी आपली स्वतः ची बंदूक यांचा 30 वर्षीय मुलगा दिपकला दिली
त्या बंदुकीमधून मयत श्रावण मोहोळकर यांना मानवंदना देण्यासाठी हवेत फायर केले दोन फायर व्यवस्थित झाले.
परंतु तिसऱ्या फायरला बंदूक लॉक झाली. त्यामुळे दिपक यांनी बंदुकीला काय झाले हे पाहण्यासाठी बंदूक आडवी केली.
ही बंदूक तपासत असताना याचं बंदुकीतून अचानक गोळी सुटून ती तुकाराम वना बडगुजर यांना लागली.
कोणतीही परवानगी न घेता मानवंदना
कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण नसताना बंदुका हाताळल्यामुळे हा प्रकार घडला आहे.
या सगळ्यात धक्कादायक प्रकारात अती हौशीपणामुळे तुकाराम बडगुजर यांचा बळी गेलेला आहे
मानवंदना कोणाला दिली जाते कशी दिली जाते त्याची अधिकृत परवानगी काढावी लागते.
याकडे दुर्लक्ष करत या मोहकर परिवाराने अतिउत्साह दाखवला आहे.