Mon. Jan 24th, 2022

पत्ता विचारायला गेला अन जीवाला मुकला !

पत्ता विचारणाऱ्या तरुणाला आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. पत्ता विचारण्यासाठी घरात आलेल्या तरुणाला चोर समजून स्थानिकांनी मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला.

राज्यातील विदर्भातील चंद्पूर (chandrapur) जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. सदर प्रकार शहरातील पागलबाबा नगर येथे गुरुवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडला.

पंकज लांडगे असं मृत्यू पावलेल्या तरुणाचं नाव आहे. दुसरा तरुण जखमी झाला आहे. अविनाश किल्लो असं जखमी तरुणाचं नाव आहे.

नक्की काय घडलं ?

पंकज आणि त्याचा मित्र हे बल्लारपूरात उधार दिलेले पैसे मागण्यासाठी गेले.

यावेळेस त्यांना अपेक्षित ठिकाणी जाण्यासाठी पत्ता विचारायचा होता.

हा पत्ता विचारण्यासाठी हे दोघे जवळील घरात गेले.

पत्ता विचारण्यासाठी घरात गेलेले दोघे जण चोर असल्याचा समज त्या घरातील लोकांचा झाला.

चोर असल्याच्या समजून स्थानिकांनी दोघांना झाडाला बांधून मारहाण केली.

या मारहाणीत पंकजला जीवाला मुकावे लागले.

या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. तसेच या घटनेचा अधिकचा तपास पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *