कथ्थक नर्तक बिरजू महाराज यांचे निधन

कथ्थक नर्तक पद्म विभूषण पंडित बिरजू महाराज यांचे निधन झाले आहे. बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून वयाच्या ८३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिरजू महाराज यांचे नातू स्वारांश मिश्रा यांनी समाज माध्यमावर त्यांच्या निधनाची माहिती दिली.
बिरजू महाराज यांचे कार्य
कथ्थक नर्तक बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी झाला होता.
कथ्थक नृत्याच्या अलाहाबादच्या कालका-बिंदादिन घराण्याचे नर्तक होते.
शतरंज के खिलाडी, देवदास, उमराव जान, बाजीराव मस्तानी इत्यादी चित्रपटात बिरजू महाराज यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे.
कथ्थकसह महाराज शास्त्रीय गायनसुद्धा करत होते.
१९८३मध्ये बिरजू महाराज यांना पद्म विभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.
बिरजू महाराज यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास पुरस्काराने गौरवण्यात आले.
निवृत्तीनंतर त्यांनी कलाश्रम ही नृत्य/नाट्य संस्था सुरू केली.