Fri. Sep 24th, 2021

धरणांच्या तालुक्यात पाणीटंचाईचा पहिला बळी

जय महाराष्ट्र न्यूज, शहापूर

 

धरणांच्या तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापुरमध्येचं पाणीटंचाईचा बळी गेला आहे. पाण्यासाठी 10 किलोमीटर पायपीट केल्यानं पाण्याअभआवी तडफडून दांड गावातील एका तरूणाचा मृत्यू झाला. 

 

मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं शहापूर तालुक्यात असूनही हा भाग कायमचं तहानलेला राहिला. सध्या अनेक गावातील विहीरी कोरड्याठाक पडल्यात, अनेक गावातल्या लोकांना तर पाण्यासाठी दररोज रखरखत्या उन्हात 10 किलोमीटर पायपीट करावी लागते. 

 

दररोजप्रमाणेचं 10 किलोमीटरवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या तुकाराम आगीवले या तरूणाचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू झाला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *