Sun. Sep 22nd, 2019

निठारी हत्याकांडातील दोषी कोली आणि पंधेरला फाशी

0Shares

वृत्तसंस्था, गाजियाबाद

 

देशाला हादरवणाऱ्या बहुप्रलंबित निठारी हत्याकांडातील दोषींना अखेर आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निठारी हत्याकांडातील राक्षसी कृत्यानं संपूर्ण देश हळहळला होता. गाजियाबादच्या विशेष न्यायालयाने आज ही शिक्षा ठोठावली आहे.

 

निठारी प्रकरणातील हा आठवा गुन्हा होता. पिंकी सरकार या 20 वर्षीय तरूणीच्या हत्येशी संबंधित हे प्रकरण आहे. या तरूणीच्या हत्येप्रकरणी 29 डिसेंबर 2006 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पवन कुमार तिवारी यांनी कोली आणि पंढेर यांना दोषी ठरवले होते.

 

5 ऑक्टोबर 2006 रोजी पीडित तरूणी तिच्या कार्यालयातून घरी जात होती. पंधेरच्या घराजवळूनच जात असताना कोलीने तिची हत्या केली. तिचे मुंडके उडवून धडापासून वेगळे केले आणि मुंडके घराच्या पाठीमागे फेकून दिले होते. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर पोलिसांनी तपास केल्यावर पंधेरच्या घरामागे 16 खोपड्या आढळून आल्या होत्या. या दोघांनी लहान मुलींच्या सर्वाधिक हत्या केल्याचंही आढळून आलं होतं.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *