Sun. Jun 20th, 2021

‘जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार’, Twitter वरून धमकी

राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर असभ्य टीका केल्याच्या आरोपाखाली एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. त्यांना बडतर्फ करण्याची मागणी होत आहे. तर ट्विटरवर जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली आहे.

जितेंद्र आव्हाड यांना Twitter वर ‘तुझा दाभोलकर होणार’ अशी धमकी एकाने दिली आहे. या धमकीमुळे खळबळ उडाली आहे.

Image

कैलासराणा गणेश सूर्यवंशी असं या धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पोलिसांत तक्रार दाखल करणार आहे.

कालपासून जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोशल मीडियावर टीका करण्यात येत आहे. ट्विटरवर ‘शेम ऑन जितेंद्र आव्हाड’ हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता. अशावेळी थेट जीवे मारण्याची धमकी देणारं ट्विट हे धक्कादायक आहे.

नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी मॉर्निंग वॉक करताना निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मारेकऱ्यांना अद्याप शिक्षा झालेली नाही. त्यानंतरही गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या अशाच पद्धतीने हत्या झालेल्या होत्या.

हिंदुत्ववादी विचारांना विरोध केल्याबद्दल त्यांना हत्येपूर्वी धमक्या देण्यात आल्या असल्याचा संशय आहे. त्याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांना हत्येची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ माजली आहे.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *