महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ करमुक्त, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

आज बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. ‘तान्हाजी..द अनसंग वॉरिअर’ हा सिनेमा राज्यात करमुक्त करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात तान्हाजी सिनेमा करमुक्त करण्यात यावा, अशी मागणी केली जात होती.

तसेच विरोधकांकडून देखील सिनेमा करमुक्त न केल्याने सरकारवर ताषेरे ओढले जात होते.

दरम्यान महाराष्ट्राआधाी उत्तर प्रदेश आणि हरयाणा राज्य सरकारने तान्हाजी सिनेमा करमुक्त केला होता.

तान्हाजी सिनेमाने गेल्या काही दिवसांमध्ये चांगलीच कमाई केली आहे. तान्हाजी सिनेमा प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडला आहे.

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात अजय देवगण, सैफ अली खान आणि शरद केळकर हे मुख्य भूमिकेत आहे.

दरम्यान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट केले होते. तान्हाजी सिनेमा करमुक्त करण्यासंदर्भात मंत्रिमंडळात एकमत झाल्याबद्दलची माहिती त्यांनी ट्विट द्वारे दिली होती.

Exit mobile version