Sun. May 16th, 2021

आता CMचीही होऊ शकते ‘In Camera’ चौकशी, कारण….

CM यांना देखील लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज महाराष्ट्र सरकारने घेतलाय. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम सुधारणेला मंजुरी देण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यासंदर्भात मागणी केली होती.

काय होणार यामुळे?

आता मुख्यमंत्रीदेखील लोकायुक्तांच्या कक्षेत येणार.

यामुळे लोकायुक्त मुख्यमंत्र्यांची ‘इन कॅमेरा’ चौकशी करू शकतील.

मंत्रिमंडळातील इतर मंत्री लोकायुक्तांच्या कक्षेत होते.

मात्र आता मुख्यमंत्र्यांचीही चौकशी करता येणार.

तरीही अण्णा उपोषण करणारच!

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मात्र तरीही उपोषणावर ठाम आहेत.

30 जानेवारीपासून राळेगणसिद्धी गावात यादव बाबा मंदिरात आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत.

सकाळी 10 वाजता अण्णा यादव बाबा मंदिरात दर्शन घेऊन ते आपलं आंदोलन सुरू करतील.

आंदोलनाच्या पूर्व संध्येला याबाबत बोलताना अण्णांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केलं.

मुख्यमंत्रीपद लोकायुक्त कायद्याच्या अखत्यारीत आणण्याच्या ठरावाला मंजुरी मिळाली आहे.

मात्र लोकायुक्त हा विषय नाही. तर लोकपालच्या नियुक्तीचाही आहे.

शेतमालाला उत्पादनखर्चाच्या दीडपट भाव मिळालाच पाहिजे, ही देखील मागणी आहे.

या मागण्यांना सरकार मंजुरी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपण आंदोलन बेमुदत करू असा इशारा दिला आहे.

सरकारने लोकायुक्ताबाबत एक पाऊल पुढे टाकलं असले तरी अण्णा त्यावर समाधानी नसून सरकारने लोकायुक्त कायद्याचा अध्यादेश काढावा अशी मागणी अण्णांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *