देशभरात कोरोना रुग्णांमध्ये घट आणि मुंबईत वाढ

देशभरात दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळते आहे. तरी सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ११ हजार ७३९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. देशात सध्या ९२ हजारहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. शनिवारी दिवसभरात १० हजार ९१७ रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ९२ हजार ५७६ इतकी झाली आहे.
मुंबईत कोरोना रुग्णात नव्याने भर
मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी मुंबईत ८४० नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच मुंबईत शनिवारी २०५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या १० लाख ७२ हजार ९६३ वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के इतका झाला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईमधील नागरिकांची चिंता वाढली आहे.