CoronaVirus

देशभरात कोरोना रुग्णांमध्ये घट आणि मुंबईत वाढ

 

देशभरात दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळते आहे.  तरी सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ११ हजार ७३९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. देशात सध्या ९२ हजारहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. शनिवारी दिवसभरात १० हजार ९१७ रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ९२ हजार ५७६ इतकी झाली आहे.

मुंबईत कोरोना रुग्णात नव्याने भर

मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी मुंबईत ८४० नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच मुंबईत शनिवारी २०५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या १० लाख ७२ हजार ९६३ वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के इतका झाला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईमधील नागरिकांची चिंता वाढली आहे.

manish tare

Recent Posts

समीर वानखेडे यांची मलिकांविरोधात तक्रार

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना नुकताच…

53 mins ago

‘लोक निवडून देतात ती घराणेशाही कशी?’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर टीका…

3 hours ago

मुकेश अंबानींच्या कुटुंबियांना धमकी

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चार ते पाच…

3 hours ago

‘भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही देशाला लागलेली कीड’

७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण पार पडला. यावेळी देशाला संबोधित…

4 hours ago

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

 देशाचा आज ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज शासकीय कार्यालये,…

4 hours ago

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं संबोधन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून भाषण केले. या भाषणात त्यांनी देशाच्या आशा-आकांक्षा…

19 hours ago