कोरोनानंतर बेरोजगारीच्या दरात घट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली होती. कोरोनाने प्रत्येकाच्या घरापाशीच थैमान ठोकले होते. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य होते. कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे सरकारने संपूर्ण देशात टाळेबंदी घोषीत केली होती. या टाळेबंदीचा फटका सर्वसामान्यांना बसला. कोरोना काळात अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या संख्येन वाढले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट झाली असल्यामुळे देशातील कोरोना नियम शिथिल करण्यात आले आहेत. देशातील टाळेबंदी हटवल्यामुळे सर्व कामकाज पूर्वीसारखे सुरू झाले असून अनेक बेरोजगार नागरिकांना कामाच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या. त्यामुळे कोरोनानंतर बेरोजगारी दरात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. फेब्रुवारी २०२२मध्ये बेरोजगारीचा दर ८.१०टक्के इतका झाला होता. तर २ एप्रिलला दर ७.५ टक्क्यांवर पोहचला आहे.
कोरोनानंतर देशाची अर्थव्यवस्था पूर्ववत झाल्यामुळे बेरोजगारीच्या दरात घट झाली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) बेरोजगारी दराची आकडेवारी जाहीर केली आहे. सीएमईईच्या दरमहा येणाऱ्या आकडेवारीनुसार, देशात बेरोजगारीचा दर फेब्रुवारी महिन्यात ८.१० टक्के होता. त्यानंतर मार्चमध्ये या दरात आणखी घट होऊन ७.६ टक्के झाला. तर २ एप्रिल रोजी हा दर ७.५ टक्क्यांवर आला आहे.
राज्य आणि बेरोजगारीचा दर
हरियाणा : २६.७ टक्के
राजस्थान : २५ टक्के
जम्मू-काश्मीर : २५ टक्के
बिहार : १४.४ टक्के
त्रिपुरा : १४.१ टक्के
पश्चिम बंगाल : ५.६ टक्के