महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी!

महाराष्ट्र: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्माण झालेल्या संकटामध्ये महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या सहसचिवांनी याबाबत माहिती दिली आहे.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, औरंगाबाद, जळगाव, नांदेड नव्या रुग्णांची नोंद कमी होत आहे. लातूर, नंदूरबार, वाशिम, भंडारा, धुळे आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्येसुद्धा कमी रुग्णांची नोंद होत आहे.

राज्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, जळगावसह १२ जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांचा आकडा घटताना दिसत आहे. महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्येही कोरोना रुग्णांचा आलेख सपाट होत असून या राज्यांमध्ये लवकरच नव्या रुग्णांचा आलेख घटतांना दिसू शकेल, अशी आशा आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.

Exit mobile version