Thu. May 6th, 2021

दिल्ली हिंसाचारातील आरोपी दीप सिद्धूला जामीन मंजूर

दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर २६ जानेवारी रोजी धार्मिक झेंडा फडकवल्याप्रकरणी दीप सिद्धूला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी दिल्ली न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे. त्याचबरोबर न्यायालयाने जामीन देताना काही अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत.

या अटींनुसार दीप सिद्धूला पासपोर्ट तपास अधिकाऱ्यांकडे जमा करण्यास सांगितला आहे. त्याचबरोबर तो वापरत असलेल्या फोन नंबरची नोंद तपास अधिकाऱ्याकडे करण्यास सांगितली आहे. या फोनचं लोकेशन २४ तास ऑन ठेवण्याबरोबर फोन बंद करण्यास मनाई केली आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि १५ तारखेला आपलं लोकेशन सांगण्याची अटदेखील घालण्यात आली आहे.

८ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत आरोपी दीप सिदधूने स्वत: निर्दोष असल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर केला होता. तसेच जामीन देण्याची विनंतीसुद्धा केली होती. या प्रकरणात मला फसवलं जात असल्याचा आरोप त्याने केला होता, तर सरकारी पक्षाने जामीन अर्जाला विरोध करत दीप सिद्धू मुख्य आरोपी असल्याचं सांगितलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *