Thu. Aug 11th, 2022

खोल दरीत बसचा अपघात

पालघरमधील वाघोबा घाटात प्रवाशांनी भरलेल्या बसला भीषण अपघात झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाची बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट दरीत कोसळली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातामध्ये किमान 15 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. सर्व जखमींना पालघरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन मंडळाची भुसावळ-पालघर रातराणी बस नाशिकवरून पालघरच्या दिशेने निघाली होती. सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास वाघोबा घाटात एका वळणावर बसवरील वाहन चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात उलटली. या बसमधून 20 ते 25 प्रवाशी प्रवास करीत होते. यातील किमान 15 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढत पालघरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. बस चालक मद्यपान करून भरधाव वेगानं गाडी चालवत असल्याने हा अपघात झाला असं प्रवाशांचे म्हणणे आहे.

‘आम्ही कंडक्टरला सांगत होतो की चालक मद्यधुंद अवस्थेत आहे. त्याच्या हातामध्ये गाडीचं स्टेअरिंग देऊ नये. तरी कंडक्टरने आमचं न ऐकता चालकाची पाठराखण केली. मात्र चालक अगदी वेगात गाडी चालवत होता. त्यामुळेच हा अपघात झाला’,  अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.