Fri. Jul 30th, 2021

INDvsWI : तिसऱ्या वनडेआधी टीम इंडियाला मोठा झटका

कटक : टीम इंडियाला विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या वनडेआधी मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाच्या मागे लागलेलं दुखापतीचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमारच्या पाठोपाठ टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. बीसीसीआयने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

त्यामुळे या खेळाडुला विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या सामन्याला मुकावे लागणार आहे. दीपक चहरला ही दुखापत झाली आहे. त्यामुळे संघामध्ये त्याच्याऐवजी नवदीप सैनीला संधी देण्यात आली आहे.

विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या वनडेदरम्यान दीपक चहरच्या पाठीच्या खालच्या भागाला दुखापत झाली होती. त्यानंतर मेडिकल टीमने दीपकला आरामाचा सल्ला दिला आहे.

3 मॅचच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया आणि विंडिजने प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. त्यामुळे 3 सामन्याच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे तिसरा सामना दोन्ही टीमसाठी महत्वाचा असणार आहे. तिसरा सामना 22 डिसेंबरला कटक येथे खेळला जाणार आहे.

तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), मनीष पांडे, शिवम दुबे, शार्दुल ठाकुर, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, मोहम्मद शमी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *