प्रेग्नंसीबद्दल विचारल्यावर दीपिका म्हणते …

बॉलिवूडचे क्यूट कपल दीपिका-रणवीर हे गेल्या वर्षी लग्न बंघनात अडकले. त्यांच्या लग्नाला काही काळ होत नाही तर दीपिका प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू होती. एका मुलाखतीदरम्यान दीपिकाने याबद्द भाष्य केले. जेव्हा व्हायचं आहे, तेव्हा होईल असे दीपिकाने म्हटलं आहे. लग्न झाल्यापासून तिला हा प्रश्न विचारत असल्यामुळे तिने शेवटी मुलाखतीत याबाबतीत सांगितले.

काय म्हणाली दीपिका पदुकोण ?

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दीपिका-रणवीरने लग्नगाठ बांधली.

मात्र लग्न झाल्यापासून दीपिकाला तु आई कधी होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

ती प्रेग्नेंट असल्याचीही चर्चा सुरू होती.

मात्र एका मुलाखतीत बोलत असताना, जेव्हा व्हायचं आहे, तेव्हा होईल असं दीपिकाने म्हटलं आहे.

आई होण्यात एक वेगळचं सुख असतं असे मी ऐकल आहे.

मात्र जेव्हा वेळ येईल तेव्हा मी आई होणारच आहे. यामुळे आमच्यावर दबाव टाकला जात असल्याचे वाटतं आहे.

लग्नानंतर त्वरीत आई होण्याचा दबाव टाकला जात असून हा प्रश्न विचारू नये असेही तिने सांगितले आहे.

जेव्हा असे प्रश्न बंद होतील तेव्हाच समाजात बदल होईल, असे देखील तिने यावेळी म्हटलं आहे.

Exit mobile version