Mon. Sep 20th, 2021

‘छपाक’ चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक पाहिलात का ?

 

 

अभिनेत्री दीपिका पादुकोणने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले असून तिच्या हटके भूमिकेची नेहमीच चर्चा होते. दीपिकाचा आगामी चित्रपट छपाकमध्ये ही तिने वेगळी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात दीपिकाने अॅसिड हल्ल्यात बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल यांची भूमिका साकारली आहे. अॅसिड हल्ल्यात बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल यांच्या जीवनावर अधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. दीपिकाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा लूक रिलीज केला आहे. मेघना गुलजार या चित्रपटाच्या दिग्दर्शिका असून दीपिकाचा निर्माती म्हणून पहिला चित्रपट आहे.

कसा असेल छापक ?

छपाक चित्रपटात दीपिकाने ‘मालती’ ची भूमिका साकारली आहे.

हा चित्रपट अॅसिड हल्ल्यात बचावलेल्या लक्ष्मी आगारवाल यांच्या जीवनावर अधारित आहे.

अॅसिड हल्ला होऊन सुद्धा जीवन जगण्याचा सकारत्मक दृष्टीकोण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच अॅसिड हल्ल्यानंतरचा प्रवास, संघर्ष आणि संकटांवर मात करत जीवन जगणे याबद्दल दाखवण्यात आले आहे.

 कोण आहे  लक्ष्मी अगरवाल?

वयाच्या १५ वर्षी त्यांच्यावर ऍसिड हल्ला झाला होता.

अगदी सहजचपणे विक्री होत असलेल्या घातक अशा अॅसिड विरोधात लक्ष्मी ह्या कोर्टामध्ये लढत आहेत.

त्यांच्या #StopSaleAcid मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

त्यांना वुमन एम्पावरमेंट अॅवॉर्ड 2019 ने सन्मानित केले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *