Mon. Jul 4th, 2022

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : आपच्या 70 उमेदवारांची यादी जाहीर

दिल्लीत विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहेत. दिल्लीत एकूण 70 जागांसाठी निवडणूक 8 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने आपल्या 70 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री हे नवी दिल्ली या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे पटपडगंज मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

आपने यंदाच्या निवडणुकीसाठी एकूण 8 महिलांना उमेदवारी दिली आहे. तर 15 विद्यमा आमदारांना डच्चू देण्यात आला आहे.

अधिक वाचा : दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा

उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यासाठी मंगळवारी ‘आप’कडून पॉलिटिकल अफेअर्स समितीच्या बैठकीचे आयोजन केले गेले होते.

या बैठकीमध्ये आपच्या 70 उमेदवारांच्या यादी अंतिम करण्यात आली.

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये आपचे 70 पैकी 67 उमेदवार विजयी झाले होते.

दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विशेष म्हणजे ही मतदान प्रक्रिया एकाच टप्प्यात पार पडणार आहे.

उमेदवारांना 21 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

तर 22 जानेवारीला अर्जाची छाननी करण्यात येईल. तर 24 जानेवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे.

दिल्लीत एकूण २६८९ ठिकाणी १३ हजार ७५० मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दिल्लीत एकूण १ कोटी ४६ लाख मतदार आहेत.

विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २२ फेब्रुवारीला संपत आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक 2015 पक्षीय बलाबल

आम आदमी पार्टी : 67

भाजप : 3

काँग्रेस : 0

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.