Fri. Apr 19th, 2019

IPL 2019: दिल्लीचा 7 गडी राखून कोलकातावर विजय

15Shares

दिल्ली विरुद्ध कोलकाताच्या सामन्यात दिल्ली ने 7 गडी राखून कोलकातावर विजय मिळवला आहे.हा सामना कोलकाताच्या मैदानावर झाला असून प्रथम फलंदाजी करत कोलकाताने 20 षटकात 7 बाद 178 धावा केल्या होत्या. सलामीवीर शिखर धवनने नाबाद ९७ धावा काढल्याने दिल्लीने हे 179 धावांचे आव्हान 7 चेंडू राखत पूर्ण केलं आहे.

कोलकाताचं दिल्लीसमोर 179 धावांच आव्हान

कोलकाताकडून सलामीवीर जो डेण्टली पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला.

रॉबिन उथप्पा 4 चौकार आणि 1 षटकार लगावत 30 चेंडूत 28 धावा करत तो झेलबाद झाला.

शुभमन गिल याने अप्रतिम खेळी खेळत 39  चेंडूत दमदार 65  धावा केल्या.

नितीश राणाने 12  चेंडूत 11 धावा केल्या आणि  झेलबाद झाला.

कर्णधार दिनेश कार्तिक 2 धावांवर बाद झाला आंद्रे रसलने नेहमीप्रमाणे फटकेबाजी करत 45धावा केल्या.

क्रेग ब्रेथवेट 6 धावांवर बाद झाला. पियुष चावलाच्या 6 चेंडूत 14  धावा काढल्या.

कोलकाताने  20 षटकांत  178  धावांचे आव्हान दिल्लीसमोर ठेवले आहे.

दिल्लीची संयमी खेळी

दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

179 धावांच्या आव्हान पेलत असताना सलामीवीर पृथ्वी शॉ झेलबाद झाला.पृथ्वीने 14  धावा काढल्या.

कर्णधार श्रेयस अय्यर केवळ ६ धावा करत माघारी परतला आणि दिल्लीला दुसरा धक्का बसला.

शिखर धवनच्या साथीने  ऋषभ पंतने दमदार फटकेबाजी करत तो 46 धावा करून बाद झाला.

शिखर धवन 97  धावा करून नाबाद राहिला. त्याने 11 चौकार आणि 2  षटकार खेचले.

दिल्ली ने 7 गडी राखून कोलकातावर विजय मिळवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *