Mon. Dec 6th, 2021

दिल्ली विधानसभा निवडणूक २०२० : भाजपच्या ५७ उमेदवारांची यादी जाहीर

दिल्लीत विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. जानेवारी १४ ला या निवडणुकीसाठीची अधिघोषणा करण्यात आली.

आम आदमी पक्षापाठोपाठ आता भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने आपल्या एकूण ५७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही यादी जाहीर केली आहे.

भाजपने ५७ पैकी एकूण ४ महिलांना उमेदवारी दिली आहे. तर अनूसुचित जातीतील (एससी) प्रवर्गाताील एकूण ११ जणांना उमेदवारी दिली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : आपच्या 70 उमेदवारांची यादी जाहीर

उर्वरित उमेदवारांची यादी आम्ही लवकरच जाहीर करु, अशी माहिती दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारींनी दिली. जाहीर केलेल्या उमेदवार हेच विजयी उमेदवार आहेत, असा विश्वास यावेळी मनोज तिवारी यांनी व्यक्त केला.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा

आम्ही लोकांसमोर सकारात्मक व्हिजन घेऊन समोर जाणार असल्याचं तिवारी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *