Thu. Sep 19th, 2019

#IPL2019 दिल्लीची हैदराबादवर २ गडी राखून मात

0Shares

प्लेऑफमध्ये पुन्हा संधी मिळाल्यानंतरही हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबाद आणि दिल्लीमध्ये झालेल्या सामन्यात दिल्लीने २ गडी राखून विजय मिळवला आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत दिल्लीला १६३ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचे पाठलाग करताना दिल्ली संघाचा पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंतने फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. दिल्लीचा पुढचा सामना चेन्नईबरोबर होणार आहे.

हैदराबादचा पराभव –

दिल्लीविरूद्ध हैदराबाद या सामन्यात हैदराबादचा पराभव झाला आहे.

विशविशाखापट्टणमच्या मैदानावर हा सामना रंगला.

नाणेफेक जिंकून दिल्लीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

हैदराबादने प्रथम फलंदाजी करत दिल्लीपुढे १६३ धावांचे आव्हान ठेपले.

या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघाच्या पृथ्वी शॉ आणि  ऋषभ पंतने धडाकेबाज कामगिकी बजावली आहे.

पृथ्वी शॉने अर्धशतक पूर्ण करत माघारी परतला.

मात्र सलामीवीर ऋषभ पंतने चांगली खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

हैदराबाद संघाचे खलिल अहमद, राशिद खानने आणि भुवनेश्वर कुमारने २-२ बळी टिपले.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *