Mon. Dec 6th, 2021

Surgical Strike 2 नंतर केजरीवाल यांची बदलली भाषा!

पुलवामा येथे भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये 40पेक्षा जास्त जवान शहीद झाल्यानंतर फक्त 12 दिवसांमध्येच भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. भारतीय वायू सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून तेथील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. भारतीय वायूदलावर कौतुकाचा वर्षाव होतोय. राजकीय विरोधकही मतभेद विसरून भारत सरकारच्या कठोर कारवाईचं एकमुखाने अभिनंदन करत आहेत. आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही भारतीय वायू दलाचं ट्विट करून कौतूक केलं आहे.

 केजरीवालांचं ट्विट

 

ट्विटरने  अरविंद केजरीवाल यांनी भारतीय वैमानिकांना सलाम केला आहे.

भारतीय वायूसेनेच्या शूर वैमानिकांचा मला अभिमान आहे, आज तुमच्यामुळे हा अभिमानाचा क्षण अनुभवायला मिळत आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये 40पेक्षा जास्त जवान शहीद झाल्याने फक्त 12 दिवसांमध्येच भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला.

पहाटे 3.30 वाजता ही कारवाई करण्यात आली.

12 मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले.

या कारवाईत मोठ्या संख्येने जैशचे दहशतवादी, ट्रेनर,सिनीयर कमांडर्सना नष्ट केले.

यााधी मागितले होते पुरावे

भारत सरकारने केलेला हा दुसरा surgical strike आहे. यापूर्वी 18 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या उरी हल्ल्यानंतरही भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. मात्र या हल्ल्यानंतर विरोधकांनी सरकारचं अभिनंदन करण्याऐवजी शंकाच उपस्थित केली होती. विशेषतः अरविंद केजरीवाल यांनी Surgical Strike चे पुरावे मागितले होते. याबद्दल केजरीवाल यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली होती. कालांतराने Surgical strike ची व्हिडिओ क्लिप प्रदर्शित केली. त्यामुळे या वेळी  पाकिस्तानला दिलेल्या चोख प्रत्युत्तराचे केजरीवाल यांनी पुरावे मागितले नाहीत. तसंच त्यांनी आपलं उपोषणही पुढे ढकललं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *