Jaimaharashtra news

एक्स-गर्लफ्रेण्डला मारहाण करणाऱ्या ‘त्या’ नराधमावर अखेर कारवाई

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मुलगा एका मुलीला लाथाबुक्क्यांनी मारत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल. या मुलाचं नाव रोहित तोमर असून अखेर त्याला अटक करण्यात आलं आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील दिले आहेत.

दिल्लीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोकसिंह तोमर यांचा मुलगा रोहित याने एका तरुणीला निर्दयीपणे मारहाण केली होती. या मारहाणीचा  संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.लज्जास्पद बाब म्हणजे रोहितच्या मित्रानेच हा व्हिडिओ शूट केला होता. या प्रकरणी रोहितवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. पोलिसांनी सुरुवातीला रोहितवर विनयभंग आणि मारहाणीचाच गुन्हा दाखल केला होता. मात्र, हे प्रकरण याहूनही गंभीर असल्याचं आता समोर आलं आहे.

रोहितने 2 सप्टेंबर रोजी पीडित तरुणीला मित्राच्या सायबर कॅफेत बोलावले. तिथे रोहितने तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणीने त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करू असं म्हणताच रोहित चिडला आणि त्याने पीडित तरुणीला अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एखादा पराक्रम करत असल्याप्रमाणे या निर्लज्ज वर्तणुकीचा त्याने व्हिडिओही शूट करून घेतला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर आरोपीवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली. सहाय्यक उपनिरीक्षकाचा मुलगा असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप केला जात होता. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिेले.

अखेर पोलिसांनी रोहितला अटक केली असून न्यायालयाने त्याला सध्या फक्त एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version