निर्भया प्रकरणी दोषींच्या फाशीची तारीख अखेर ठरली

निर्भया प्रकरणातील चारही नराधमांच्या फाशीची अंतिम तारीख अखेर ठरवण्यात आली आहे. या चारही नराधमांना 20 मार्चला एकाच वेळी फाशी देण्यात येणार आहे. या नराधमांना 20 मार्चला सकाळी 5.30 वाजता फाशी दिली जाणार आहे.
दिल्लीमधील पटियाला हाऊस कोर्टाने ही तारीख दिली आहे. या आधी या आरोपींची 3 वेळा फाशी ठळली होती. निर्भया प्रकरणातील पवन गुप्ता, अक्षय ठाकरू, विनय शर्मा आणि मुकेश या आरोपींच्या फाशीला विलंब लागत होता.
मात्र आता यांना अखेर फाशी देण्यात येणार आहे. फाशीच्या दिवसाच्या आधी सर्व आरोपींना त्यांच्या वकिलाला भेटता येईल.
न्यायालयात सुनावणीच्या वेळेत आरोपींच्या वकिलांकडून आरोपींचा बचावाचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी दोषी तुरूंगात राहून त्यांच्यात सुधारणा होत होती. तर त्यांना फाशी का द्यायची, असे आरोपींचे वकील ए. पी. सिंह यांनी स्पष्ट केले.
तसेच फाशीची सुनावणी झाल्यानंतर निर्भयाच्या आईने तिचे मत माध्यमांसमोर स्पष्ट केले. आता आरोपींचे वकील फाशी टाळण्यासाठी दुसरा काही पर्याय वापरू शकतात.
त्यामुळे जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत मला समाधान वाटणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.तसेच त्यांना फाशी निश्तितच होईल. अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.