Tue. Sep 27th, 2022

Delhi Election Result 2020 : ‘रिंकीया के पापा’ गाण्यावर नाचत साजरा केला विजय

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा विजय झाला आहे. या विजयासह आपने दिल्लीत विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आहे. या विजयासाठी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकर जनतेचे आभार मानले आहेत.

आम आदमी पक्षाच्या विजयानंतर अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या आनंदाने हा विजय साजरा केला. काही उत्साही कार्यकर्त्यांनी मनोज तिवारी यांच्या ‘रिंकीया के पापा’ या गाण्यावर थिरकत विजय साजरा केला आहे.

कार्यकर्त्यांच्या या गाण्यावर नाचतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तसेच आपच्या ट्विटर अकाउंटवरुन एक गिफ्ट फाईल शेअर केली आहे. ‘हम जित गये’  अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

आपच्या विजयानंतर भाजपला आणि मनोज तिवारी यांना डिवचणाऱ्या अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार दिल्लीत आपचा एकूण ६३ जागांवर विजय झाला आहे. तर भाजपला ७ जागांवर विजय झाला आहे.  

Delhi Election Result : दिल्लीत आपची सत्तेची हॅट्रिक

Delhi Election Result 2020 : दिल्लीत काँग्रेसच्या ‘हाती’ भोपळाच

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.