Mon. Jul 4th, 2022

Delhi Election Result : दिल्ली कोणाची ? ठरणार मंगळवारी

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी ८ फेब्रुवारीला मतदानप्रक्रिया पार पडली. दिल्लीत ७० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. शनिवारी ८ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी एकूण ६२.५९ टक्के इतकं मतदान झालं.

यानंतर आता सर्वांना निकालाचे वेध लागले आहे. या बहुप्रतिक्षित निवडणुकीचा निकाल मंगळवारी ११ फेब्रुवारीला ( Delhi Election Result 2020 ) जाहीर होणार आहे.

मतमोजणीसाठी निवडणूक आयोग सज्ज झालं आहे. एकूण ७० जागांसाठीच्या मतमोजणीसाठी हजारो निवडणूक अधिकारी तयार आहेत. या मतमोजणीसाठी मंगळवारी सकाळपासून सुरुवात होणार आहे.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये मतमोजणी केंद्राबाहेर पोलीसफाटा तैनात करण्यात येणार आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची थेट लढत ही आप विरुद्ध भाजप अशी आहे.

एक्झिट पोलचा अंदाज काय ?  

विविध वृत्त-सर्वेक्षण संस्थांच्या सर्वेक्षणानुसार दिल्लीत पुन्हा आपचीच सत्ता येणार असल्याचं एक्झिट पोलनुसार सांगण्यात आले आहे. दिल्लीत ‘आप’ला ५० पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचं विविध एक्झीट पोलनुसार सांगण्यात आलं आहे.

Delhi Exit Poll 2020 : विविध एक्झिट पोलनुसार पुन्हा दिल्ली ‘आपलीच’

भाजपने मोठ्याप्रमाणावर दिल्लीत प्रचार केला होता. प्रचारासाठी महाराष्ट्रातून दिग्गज नेत्यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले होते.

त्यामुळे भाजपच्या या प्रयत्नांना कितपत यश मिळते, हे मंगळवारी समजेल.

दिल्लीत एकूण ७० जागांसाठी ६५२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ६५२ उमेदवारांमधून कोणते ७० उमेदवार हे भाग्यावान ठरणार हे मंगळवारीच समजेल.

दिल्ली विधानसभा निवडणूक २०१५

दिल्ली विधानसभेच्या २०१५ च्या निवडणुकीत आपने एकहाती सत्ता मिळवली होती. आपचे ७० पैकी एकूण ६७ उमेदवारांचा विजय झाला होता. तर भाजपचे ३ उमेदवारांनी विजयश्री मिळवली होती. काँग्रेसला मात्र भोपळा देखील फोडता आला नव्हता.

दरम्यान विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ हा २२ फेब्रुवारीला संपणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.