Wed. Dec 1st, 2021

Delhi Election Result : दिल्लीत आपची सत्तेची हॅट्रिक

दिल्लीत आम आदमी पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयासह आपने दिल्लीत आपला हॅट्रिक विजय साजरा केला आहे. दिल्लीत आपने एकहाती सत्ता मिळवली आहे. यासह आपला सत्ता कायम राखण्यास यश आले आहे.

या निवडणुकीत दिल्लीकरांनी आपला स्पष्ट बहुमत दिलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार आपचा एकूण ६२ जागांवर विजय झाला आहे. परंतु २०१५ च्या तुलनेत दिल्लीत आपचं किंचीत संख्याबळ घटलं आहे.

या निवडणुकीत आपचे एकूण ६२ उमेदवार विजयी झाले आहेत. तर २०१५ च्या निवडणुकीत ६७ उमेदवारांचा विजय झाला होता. त्यामुळे आपच्या संख्याबळात ५ ने कमी झाली आहे.

आपचं संख्याबळ घटल्याचा थेट फायदा हा भाजपला झाला आहे. भाजपचे २०१५ च्या तुलनेत ५ उमेदवारांचा विजय झाला आहे. भाजपचे एकूण ८ उमेदवार विजयी झाले आहेत.

दिल्लीतील २०१५ चं पक्षीय बलाबल

आम आदमी पक्ष : ६७

भारतीय जनता पार्टी : ०३

काँग्रेस : ००

दिल्लीतील २०२० चं पक्षीय बलाबल

आम आदमी पक्ष : ६२

भारतीय जनता पार्टी : ०८

काँग्रेस : 00

वरील २०२० ची आकडेवारी अपडेट होत आहे.

दरम्यान विद्यमान दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २२ फेब्रुवारीला संपत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *