Sun. Aug 18th, 2019

थाळीला मतदानाचा रंग, ‘चौकीदार पराठा’ आणि ‘इलेक्शन थाळी’ खमंग!

4Shares

देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांचा झणझणीत तडका, चुरचुरीत भाषणांचा खमंग मसाला, मिठासभरा प्रचार आणि गोड गोड आश्वासनांची मेजवानी यांमुळे निवडणूक चांगलीच चमचमीत होण्याची चिन्हं दिसत आहेत. निवडणुकीची हिच खुमासदार पाककृती एकाच पानात चाखायला मिळाली तर? निवडणुकीच्या काळातही खवय्यांसाठी वेगळं काहीतरी  एकाच थाळीमध्ये वेगवेगळ्या राज्यातील पदार्थांची एकत्र मेजवानी आस्वाद घेता येणार आहे.

पुण्यामधील ‘बाहुबली थाळी’, ‘माहिष्मती थाळी’, ‘आईस्क्रीम थाळी’, ‘पेशवाई थाळी’, ‘बाजीराव थाळी’ अशा नानाविध थाळ्या आत्तापर्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत. गुजरात आणि राजस्थानातही ‘कुंभकर्ण थाळी’, ‘बकासुर थाळी’ अशी एका बैठकीत कधीच खाऊन संपू न शकणारी थाळी प्रसिद्ध आहे.  मात्र दिल्लीमधील एका रेस्टोरंटमध्ये चक्क ‘इलेक्शन थाळी’ introduce करण्यात आहे. मतदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी देशभरातले प्रसिद्ध खाद्यपदार्थ एकाच डिशमध्ये सर्व्ह करण्याची नवी संकल्पना सुरू झाली आहे.

निवडणुकीत आपल्यालाच मत द्यावं, म्हणून लोकांना चिकनचं भरगच्च जेवण देणाऱ्या नेत्यांची तर आपल्याला कल्पना आहे. पण या आहाराला भुलून मत विकणं चुकीचं आहे. मात्र दिल्लीमध्य़े सध्या गाजत असणारी ‘इलेक्शन थाळी’ मात्र आवर्जून चाखावी अशी आहे.

या थाळीत कायआहे ‘स्पेशल’  ?

इलेक्शन थाळीचं वैशिष्ट्य थाळीच्या आकारापासूनच सुरू होतं.

या थाळीचा आकार भारताच्या नाकाशाप्रमाणे आहे.

देशातल्या विविध राज्यांत मिळणारे ‘खास’ पदार्थ या भारताच्या थाळीवर त्या त्या राज्यांच्या जागेवर रचून ठेवले जातात.

या एकाच थाळीमध्ये देशाच्या खाद्यसंस्कृतीचं दर्शन घडतं.

चौकीदार पराठा!

मतदान आणि खवय्येगिरी या दोघांची सांगड घालून एक मेजवानी तयार होऊ शकते, असा विचार कोणी केला नसेल.

अशीच कल्पना डोक्यात घेऊन इलेक्शन थाळी खवय्यांसाठी तयार केली आहे.

मात्र यामध्येही आपल्या नावाने प्रसिद्ध ठरलेला पदार्थ म्हणजे ‘चौकीदार पराठा’.

स्वतःला देशाचा चौकीदार म्हणवत पंतप्रधान मोदींनी ‘ना खाऊंगा, और ना किसीको खाने दुंगा’ अशी घोषणा प्रसिद्ध केली.

मात्र या वरूनच सुचलेला ‘चौकीदार पराठा’ हा पदार्थ मात्र सर्वांनाच खायला आवडतोय.

दिल्लीमध्ये या ‘चौकीदार पराठ्या’ला खवय्यांची विशेष पसंती मिळत आहे.

ही थाळी 10 किलोची!

या मेजवानीमध्ये राज्याच्या ‘खास’ अशा पदार्थांना निवडण्यात आले आहे.

साधारण 10 किलोच्या आसपास असणाऱ्या या थाळीमध्ये 28 राज्यांतील पदार्थांना जागा दिली आहे.

यामध्ये veg  आणि non-veg अशा दोन्ही पदार्थांचा आस्वाद घेता येऊ शकतो.

काय काय आहे या थाळीत?

हैद्राबादची बिर्याणी,

लखनौचे गलौरी कबाब,

मटण पेपर फ्राय,

चिकन चेट्टीनाड,

गोवन फिशकरी

पंजाबी राजमा,

बिहारी लीट्टीचोखा,

गुजराथी ढोकळा,

खांडवी,

हिमाचल स्पेशल छोले,

दक्षिण राज्यातील भिसीबिली भात,

दाल पंचरंगी

पंजाबी बटरचिकन,

डेझर्ट मध्ये राजस्थानचा राजभोग

असा भरगच्च मेनू आहे.

महाराष्ट्रातल्या खाद्यपदार्थांबरोबरच आणखी एक जगभरात प्रसिद्ध असणारी गोष्ट म्हणजे मुंबईचे डबेवाले.

त्यामुळे मुंबईकरांचा लाडका जेवणाचा पूर्ण डब्बाच या थाळीचा एक भाग आहे.

विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी बोटावरील शाई दाखवल्यास ही थाळी अनलिमिटेड मिळणार आहे.

देशाच्या राजधानीत विविधतेत एकतेचं खाद्यरूप पाहूनच एखाद्याचं पोट भरून जाईल. संपूर्ण कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत या थाळीचा अस्वाद घेताना मतदानाबद्दल जागरूकता तर निर्माण होईलच. पण देशातील वेगवेगळ्या संस्कृतींबद्दल प्रेम आणि बंधुभाव निर्माण न झाला, तरच नवल!

4Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *