दिल्लीत लागलेल्या आगीत 43 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील बाजारात लागलेल्या आगीमुळे मृतांचा आकडा 43 वर पोहचला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीतील राणी झांसी रोडवरील फिल्मस्तान थेटरबाहेर ही आग लागली.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 30 गाड्या पोहचल्या. अग्निशमन दलाने 50 जणांना सुखरुप बाहेर काढले. दुर्घटनेत जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

जखमी रुग्णांची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रुग्णालयात भेट घेतली. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राहुल गांधीनी सदर घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना 10 तर जखमींना 1 लाख रुपयांची मदत केजरीवाल सरकारकडून करण्यात येणार आहे. जखमींवर केजरीवाल सरकारतर्फे उपचार करण्यात येणार आहेत.

भाजपकडून देखील आर्थिक मदत करण्यात येणार आहे. भाजपकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची तर जखमींना 25 हजारांची मदत करण्यात येणार आहे. खासदार मनोज तिवारी यांनी ही माहिती दिली.

या दुर्घेटनेसंबधी इमारतीचा मालक रेहान याच्याविरोधात आयपीसीच्या कलम 304 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Exit mobile version