Mon. Jan 24th, 2022

चंदा कोचर यांच्या बायोपिक प्रदर्शनावर बंदी

चंदा कोचर यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली

चंदा कोचर यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटाच नाव ‘ए सिग्नेचर दॅट रुन ए करीयर’ (Chanda: A Signature that Ruined a Career)असून या चित्रपटात अभिनेत्री गुरलीन चोप्रा ही चंदा कोचर यांच्या भूमिकेत पडद्यावर झळकणार आहे.

या चित्रपटात व्हिडिओकॉन ग्रुपला दिलेल्या कर्जामुळं गोत्यात आलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांच्या आयुष्यावरील बायोपिक लवकर रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार होता.

मात्र दिल्ली हायकोर्टानं या चित्रपटावर बंदी घातली आहे. चंदा कोचर यांचे वकील विजय अग्रवाल आणि नमन जोशी यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या चित्रपटात निर्मात्यांनी चंदा कोचर यांच्या नावाचा वापर करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती.

कोचर यांच्या विरोधात सध्या सीबीआय आणि ईडीद्वारे चौकशी सुरू आहे आणि हे प्रकरण कोर्टात आहे. त्यामुळे या चित्रपटावर कोचर यांच्या वकीलांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. या चित्रपटाच्या नावातही चंदा कोचर यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे.

तसेच मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री मुलाखतींमध्ये कोचर यांच्या खासगी आयुष्यावर उघडपणे बोलत असल्याच दिसत आहे. त्यामुळे चंदा कोचर यांच्या खटल्यावर परिणाम या होण्याची शक्यता आहे. असं त्यांच्या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयाच युक्तीवाद केला. त्यामुळं न्यायालयानं या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला.

चंदा कोचर यांच्या चौकशीचं प्रकरण नेमके काय?
व्हिडीओकॉन समूहाला ३,२५० कोटी रुपयांचं कर्ज २०१२मध्ये. देण्यात आलं होतं. चंदा कोचर यांचे पती दीपक यांनी स्थापन केलेल्या न्यू पॉवर रीनीवेबल्स या कंपनीमध्ये व्हिडिओकॉनचे प्रवर्तक वेणूगोपाल धूत यांनी भरीव गुंतवणूक केली होती. सीबीआयनं या प्रकरणी कोचर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *