दिल्लीच्या मेट्रो स्टेशनवरील भल्या मोठ्या स्क्रिनवर अचानक पॉर्न फिल्म सुरु झाल्याने खळबळ
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
दिल्लीच्या राजीव चौक मेट्रो स्टेशनमध्ये अचानक खळबळ उडाली. त्याचं कारण होतं मेट्रो स्टेशनवरची भलीमोठी स्क्रिन. एरव्ही जाहिराती झळकणाऱ्या या स्क्रिनवर चक्क पॉर्न फिल्म झळकत होती.
त्यामुळे तिथून जाणाऱ्या दिल्लीकरांची कुचंबना झाली होती. म्हणजे करायचं तरी काय हाच प्रश्न सर्वांना पडला होता आणि हा प्रकारही घडला जेव्हा मेट्रो स्टेशन खचाखच भरलं होतं.
काही लोकांनी ही क्लिप मोबाईलवर रेकॉर्ड करुन ती सोशल मीडियावर व्हायरल केली. पण, दिल्ली मेट्रोच्या सुरक्षेसाठी तैनात CISF आणि दिल्ली पोलिसांना मात्र याची काहीच कल्पना नव्हती.
मेट्रोच्या प्रवक्त्यांनी मात्र ही स्क्रिन प्रायव्हेट कंपनीला जाहिरातीसाठी दिल्याचं सांगितले. तसेच याची चौकशी करण्याचं आश्वासनही दिले.